राशिभविष्य (दि.२६ जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि.२६ जानेवारी २०२२)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – हातून सत्कार्य घडतील. कामाचे कौतुक होईल. मानसिक समाधान लाभेल. सौख्यकारक दिवस. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – उत्तम आरोग्य लाभेल. उधारी वसूल होईल. वादविवादात शत्रू हतबल होतील. योग्य मार्गदर्शनाने कामे मार्गी लागतील. पदोन्‍नतीचे योग.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – मनःस्वास्थ्य बिघडेल. झालेल्या गोष्टींचा शोक करू नका. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. द्विधा मनःस्थिती होईल. संयमाने घ्या. वाद-विवादांपासून दूर राहा.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

कर्क – पूर्वग्रहदूषित असल्यामुळे वादविवाद होतील. पोटाचे विकार होण्याची संभावना. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक कलह टाळा.

सिंह

 

 

 

 

सिंह – मित्रमंडळींना मदत कराल. विचारांचे आदान-प्रदान होईल. आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – निर्णय घेताना सारासार विचार आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संवादाने प्रश्‍न सोडवावे लागतील. मनःस्ताप होण्याची शक्यता.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – चांगल्या लोकांशी मैत्री होईल. भाग्यकारक गोष्टी घडतील. प्रसन्‍नता लाभेल. सुवार्ता ऐकायला मिळेल. मनसोक्‍त खरेदीचा आनंद घ्याल.

वृश्‍चिक

 

 

 

 

वृश्‍चिक – खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. स्वतः कामांचा आढावा घ्या. परावलंबी राहू नका. समज-गैरसमजातून वादविवाद होतील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

धनु – आप्तेष्टांच्या गाठीभेटी मनाला प्रसन्‍नता देतील. व्यावसायिकांना आर्थिकद‍ृष्ट्या लाभदायक दिवस. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – गृहसौख्य उत्तम राहील. कुटुंबीयांना वेळ द्याल. कौतुकास्पद कार्य कराल. आत्मविश्‍वास वाढेल. मनासारख्या घटना घडतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कफजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. अचानक खर्च उभे राहतील. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. सरकारी कामांत अडचणी येतील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – आर्थिकद‍ृष्ट्या नुकसान करणारा दिवस. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका. योगसाधना आवश्यक आहे. संवाद महत्त्वाचा आहे.

Back to top button