राशिभविष्य (दि. २० जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. २० जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : नियोजित कामात अडचणी येतील. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. विद्यार्थ्यांना जबाबदारीची जाणीव होणे गरजेचे आहे. वाद-विवादापासून दूर राहा.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. प्रत्युत्तर देऊ नका. वाहने सावकाश चालवा. अनावश्यक भीतीमुळे मानसिक आरोग्य बिघडण्यची शक्यता आहे.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : हाती घेतलेल्या कामांत यश मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. धनलाभाचे योग. त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. खरेदीचा योग आहे.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. कमावलेली संपत्ती प्रतिष्ठा टिकवण्यासाठी, वस्तू सांभाळा, हरवण्याची शक्यता आहे.

सिंह

 

 

 

 

सिंह : मेजवानीचा लाभ घ्याल. भाग्यकारक घटनांचा दिवस आनंद देऊन जाईल. शुभवार्ता कानावर येईल. अलंकार, वस्त्रांची खरेदी कराल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : समज-गैरसमजातून मनःस्ताप होण्याची शक्यता. कलह टाळा. आळशी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. क्रियाशील राहणे महत्त्वाचे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : आजपर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. आनंददायी घटनांचा दिवस. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

वृश्‍चिक

 

 

 

 

वृश्‍चिक : सातत्य, ध्यास यामुळे ठरवलेल्या कामांत यश मिळेल. खर्‍या अर्थाने इच्छापूर्तीचा दिवस. केलेल्या कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. जुने आजार उद्भवतील. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : कितीही प्रयत्न केले, तरी अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस. दमा, मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. संतुलन महत्त्वाचे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

कुंभ : मनासारख्या घटना घडतील. सौख्यकारक घटनांमुळे दिवस आनंदात जाईल. सज्जनांच्या सहवासाने कार्यसिद्धी होईल. मान-सन्मान होतील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन : आरोग्य उत्तम राहील. प्रसन्‍नता प्राप्त होईल. अचानक धनलाभाचे योग. शत्रूंवर मात कराल. सौख्यकारक घटनांचा दिवस.

Back to top button