आजचे राशिभविष्य (१६ जानेवारी २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (१६ जानेवारी २०२२)

राशिभविष्य :

मेष : साहसाने कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. कलागुणांना वाव मिळेल.जवळच्या लोकांची मदत मोलाची ठरेल. भावंडांबरोबरचे वाद मिटतील.

वृषभ : कौटुंबिक कलह टाळावा. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता आवश्यक आहे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. विनाकारण वेळ वाया जाईल.

मिथुन : अनपेक्षितपणे लाभ होतील. स्वभावामध्ये सकारात्मक बदल होतील. प्रसन्नता लाभेल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल. गुंतवणूक करण्यास योग्य दिवस.

कर्क : संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. व्यक्त होणे गरजेचे आहे.

राशिभविष्य

सिंह : अथक प्रयत्नांना यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. नव्या व्यावसायिक धोरणांमुळे उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.

कन्या : कौतुकास्पद कार्य कराल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. लोककार्यामध्ये सहभाग घ्याल.

तूळ : आळस व नियोजन नसल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आत्मविश्वासाचा अभाव राहील. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील.

वृश्चिक : प्रतिक्रिया देऊ नका. सावधपणे पावले उचलावीत. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. उष्णतेचे विकार होण्याची संभावना. संतुलित आहार महत्त्वाचा आहे

धनु : व्यवसाय निमित्ताने प्रवासाचे योग संभवतात. भागीदारीमध्ये लाभ होईल. कौटुंबिक सहलीचा योग. चर्चासत्रातून मोठे काम मिळेल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.

मकर : शत्रूंवर मात कराल. अनपेक्षित यश मिळण्याचे योग. सहकार्याने कामे मार्गी लागतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्साहवर्धक वातावरण राहील.

कुंभ : संततीबाबत चिंता निर्माण होईल. विद्यार्थी मित्रांना एकाग्रता आवश्यक आहे. लॉटरी व सट्टा यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे.सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील.

मीन : वास्तुविषयक कामे लांबणीवर जातील. वादविवाद टाळावेत. आत्मचिंतनाची गरज आहे.

Back to top button