राशिभविष्य (दि. १५ जानेवारी २०२२) - पुढारी

राशिभविष्य (दि. १५ जानेवारी २०२२)

राशिभविष्य :

मेष : सामंजस्याने आपापसातील प्रश्न मिटतील. कलेला वाव मिळेल. व्यावसायिक प्रशिक्षणासाठी, ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढेल.

वृषभ : स्वतःसाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. दंतरोग होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे.

मिथुन : अध्यात्मिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस. आत्मचिंतन होईल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. अचूक अंदाज व योग्य निर्णयामुळे लाभदायक दिवस.

कर्क : अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. कोणालाही शब्द देऊ नका. जामीन राहू नका. कर्ज घेताना सावधानता बाळगणे.

सिंह : वक्तशीरपणा व दिलेला शब्द पाळल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्र मंडळींच्या सहवासाने प्रसन्नता प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

कन्या : वरिष्ठांच्या मदतीने कौटुंबिक समस्या सुटतील. नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल.

तूळ : जुने आजार उद्भवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. सरकारी कामांत अडचणी येतील. कुठेही सही करताना सतर्कता महत्त्वाची आहे. निर्णय घेताना सल्ला-मसलत करून घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक : परावलंबी स्वभावामुळे फसवणुकीची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वादविवादापासून दूर राहणे फायद्याचे. सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे.

धनु : अनेक दिवसांपासून चालू असलेल्या कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. थोरा-मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. व्यापाराच्या नवीन संधी चालून येतील.

मकर : आरोग्यवर्धक व ध्यानधारणेमध्ये दिवस जाईल. केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. पगारवाढ व बढतीची शक्यता आहे. शत्रू पीडा कमी होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.

कुंभ : नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांमध्ये अडचणी येतील. निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन : अनावश्यक भीती निर्माण होईल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. पोटासंबंधित तक्रारी संभवतात. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वादविवाद टाळावेत.

Back to top button