राशिभविष्य (दि.१३ जानेवारी २०२२) - पुढारी

राशिभविष्य (दि.१३ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनाचा अभाव संभवतो. आपल्या वस्तू सांभाळून ठेवा. प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही, याची काळजी घ्या.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : एकाग्रतेने कामे पूर्ण होतील. मनासारख्या घटना घडतील. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्र, मनासारखी खरेदी कराल.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

मिथुन : नको त्या गोष्टींना महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : व्यवसायामध्ये यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल.

सिंह

 

 

 

 

सिंह : अनेक दिवसांपासून चालू असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. नियमांचे पालन करा. आळस सोडायला हवा. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्या. नको तेच विषय समोर येतील. संयम ठेवणे गरजेचे आहे.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

वृश्चिक : कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जोडीदाराची साथ लाभेल. अभ्यास व सहकार्‍यांच्या साथीने आर्थिक उन्नती होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु : नोकरीमधे पदोन्नतीचे योग संभवतात. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. मध्यस्थी करून संतुलन साधल्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. नव्या संधी चालून येतील.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : मानसिकता व द़ृष्टिकोन सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. कामाला प्राधान्य द्या. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संवादाने प्रश्न सोडवावे लागतील.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : नियोजिीत कामांत अडचणी येतील. क्रोधावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास कमी होईल. आत्मचिंतनाची गरज आहे. निष्काळजीपणा मनःस्ताप देऊ शकतो.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळेल. आर्थिक प्रगती होईल. धनप्राप्तीचे योग. नवे मित्र होतील. लाभदायक दिवस.

Back to top button