Assam Rifles Recruitment 2022: आसाम रायफल्समध्ये विविध पदांची भरती | पुढारी

Assam Rifles Recruitment 2022: आसाम रायफल्समध्ये विविध पदांची भरती

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाम रायफल्समध्ये (Assam Rifles Recruitment 2022) तब्बल १ हजार ४०० हून अधिक पदांवर भरती होणार आहे. महासंचालक कार्यालयाकडून आसाम रायफल्स, शिलाँगने आसाम रायफल्सने टेक्निकल आणि ट्रेड्समॅन भरती २०२२ साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. (Assam Rifles Recruitment 2022)

आसाम रायफल्स टेक्निकल आणि ट्रेडसमन ग्रुप बी आणि सी मध्ये भरतीसाठी मेळावा १ सप्टेंबर २०२२ पासून तात्पुरता आयोजित केला जाणार आहे. स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत रायफलमॅन/रायफलवुमन (जनरल ड्युटी) साठी १३८० रिक्त पदांवर आणि १०४ रिक्त पदांवर भरती केली जाईल. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण १४८४ रिक्त पदांची भरती केली जाईल.

पदांचे विवरण

  • पूल आणि रस्ते – १७ पदे
  • लिपिक – २८७ पदे
  • धार्मिक शिक्षक – 9 पदे
  • ऑपरेटर रेडिओ आणि लाईन – ७२९ पदे
  • रेडिओ मेकॅनिक- 72 पदे
  • अस्त्रकार – ४८ पदे
  • प्रयोगशाळा सहाय्यक – १३ पदे
  • नर्सिंग असिस्टंट – १०० पदे
  • पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक – १० पदे
  • AYA (पॅरा-मेडिकल) – १५ पदे
  • वॉशरमन – ८० पदे
  • स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत या पदांवर भरती केली जाईल:
  • फुटबॉल – २०
  • बॉक्सिंग – २१
  • रोइंग – १८
  • धनुर्विद्या – १५
  • क्रॉस कंट्री – १०
  • व्यायाम – १०
  • पोलो – १०
  • एकूण पदांची संख्या– १४८४

वयोमर्यादा

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे, तर SC आणि ST उमेदवारांचे वय १८ ते ३३ वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्ज शुल्क

सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अशी होईल निवड

उमेदवारांची निवड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट (PST) आणि मेरिट लिस्टच्या आधारे केलं जाईल.

असे करा अर्ज

अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्ज जमा करण्यासाठी उमेदवारांना आसाम रायफल्सच्या www.assamrifles.gov.in च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.

हे आहेत हेल्पलाईन क्रमांक

या भरतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी किंवा समाधानासाठी हेल्पलाइन क्रमांक ०३६४-२५८५११८, ०३६४-२५८५११९ किंवा ८२५८९२३००३ वर कामकाजाच्या वेळेत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

Back to top button