Goa Elections २०२२ : पणजीत उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यात कांटे की टक्कर | पुढारी

Goa Elections २०२२ : पणजीत उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्यात कांटे की टक्कर

पणजी; पुढारी ऑनलाईन

गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानात पणजीत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर ते पिछाडीवर गेले. भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आघाडी घेतली आहे. उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्याचा मुख्यमंत्री कोण हे ठरूही शकते. सत्तेचा लंबक कोणाच्या बाजूने झुकतो याकडे गोव्यासह देशाचे लक्ष आहे. सकाळी आठ वाजल्यापासून पणजी व मडगाव येथे मतमोजणी सुरू झाली आहे. एकाचवेळी चाळीसही मतदारसंघांतील मतमोजणीचे नियोजन केले आहे. त्यामुळे दुपारपर्यंत बहुतांश मतदारसंघातील निकाल जाहीर होतील, असे अपेक्षित आहे.

मतमोजणीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे जनमत कौलातून स्पष्ट झाल्याने  सत्ता स्थापनेसाठी राजकीय समीकरणे आकाराला येतील. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई सरकार स्थापनेचे आमंत्रण कोणाला देतील हेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा असेल. काँग्रेसने पाच मिनिटात नेता निवड करून 2017 वरील घोळाची पुनरावृत्ती करणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

हे ही वाचा :

Back to top button