‘हमसे जमाना खुद है…जमाने से हम नहीं’ | पुढारी

'हमसे जमाना खुद है...जमाने से हम नहीं'

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

‘आज बहुमत दिन.. ‘असे म्‍हणत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक शेर देखील ट्विट करत शेअर केला आहे. या माध्‍यमातून त्‍यांनी अप्रत्‍यक्षपणे भाजपला टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे की, ‘आज बहुमत दिन..170+++++, हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है… जमाने से हम नहीं’ असे म्‍हणत त्‍यांनी भाजपला बहुमत चाचणीवरुन इशारा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 

महाराष्‍ट्रातील राजकीय नाट्यमय घडामोडीत राऊत यांनी शिवसेनेची खिंड खंबीरपणे लढवली. महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी महिनाभर चालेल्या सत्तासंघर्षात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेणे बंद केले आहे. मात्र सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून भाजपला क्‍लीन बोल्‍ड करण्‍याचे त्‍यांचे काम सुरुच आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारची आज (ता.३०) विधानसभेत शक्तिपरीक्षा होणार असून विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

आवश्यक बहुमत संख्या 145

महाराष्ट्र विकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. यात महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेससह इतर पक्ष आणि अपक्षांचा देखील समावेश आहे. 


 

Back to top button