‘सरकारचा घाम काढल्‍याशिवाय राहणार नाही’ | पुढारी

'सरकारचा घाम काढल्‍याशिवाय राहणार नाही'

मुंबई : पुढारी  ऑनलाईन  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारची आज (ता.३०) विधानसभेत शक्तिपरीक्षा होणार असून विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला. 

आमदार नितेश राणे म्‍हणाले, की बहुमत नसल्याने हंगामी अध्यक्ष सरकारकडून बदलण्‍यात आला. सरकारचा घाम काढल्‍याशिवाय राहणार नाही. येऊ दे मैदानात असे खुले आव्‍हान देखील  नितेश राणे यांनी शिवसेनेला दिले.

रायगडला देवेंद्र फडणवीस यांनी सहाशे कोटी मंजूर केले होते तर मग तुमच्या २० कोटीला कोण विचारणार असा खडा सवाल नितेश राणे यांनी शिवसेनेला विचारला. 

विधिमंडळात आज विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसनेही तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. थोड्याच वेळात सरकारची बहुमत चाचणी होईल. तत्‍पूर्वी आमदार नितेश राणे  यांनी शिवसेनेवर  जोरदार हल्‍ला चढवला आहे. 

Back to top button