विधानसभेतून भाजप आमदारांचा सभात्याग | पुढारी | पुढारी

विधानसभेतून भाजप आमदारांचा सभात्याग | पुढारी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सरकारने आज अखेर महाराष्ट्राच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. त्याला जयंत पाटील, नवाब मलिक आणि सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर शिरगणती घेण्यात आली. त्यात विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६९ मतदान झाले. तर भाजप आमदारांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वीच सभात्याग केला. यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शुन्य मतदान झाले. तर ४ आमदार तटस्थ राहिले. चार तटस्थ आमदारांमध्ये एमआयएमचे दोन, सीपीआय(एम) एक आणि मनसेच्या एका आमदारांचा समावेश आहे.

उघड शिरगणती केल्यानंतर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १६९ मतदान झाल्याचे सांगत विश्वासदर्शक ठराव संमत झाल्याचे जाहीर केले. 

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाचे आणि महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. सभागृहात येणं हे माझे भाग्य समजतो, असे ते म्हणाले.

अपडेट्स…

– विश्वासदर्शक ठरावांच्या बाजूने १६९ मतदान

– चार तटस्थ आमदारांमध्ये एमआयएमचे दोन, सीपीआय(एम) एक आणि मनसेच्या एका आमदारांचा समावेश आहे.

– भाजप आमदारांचा सभात्याग
– त्याला जयंत पाटील, नवाब मलिक आणि सुनील प्रभू अनुमोदन दिले

विश्वासदर्शक प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला

– भाजप आमदारांची सभागृहात जोरदार घोषणाबाजी

– हे अधिवेशन कायदेशीर- दिलीप वळसे पाटील, हंगामी विधानसभा अध्यक्ष

– हे अधिवेशन नियमबाह्य- फडणवीस

-अधिेवेशन नियमाला धरुन नाही- देवेंद्र फडणवीस
– थोड्याच वेळात ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा

– विधीमंडळात आज विश्वासदर्शक ठरावावेळी उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसनेही तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

-विधानसभा अधिवेशनात उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी- शिवसेनेकडून आमदारांना व्हीप जारी 

– राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विधानसभेत दाखल

– माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत दाखल

– भाजपच्या पायाखालची वाळू सरकली- एकनाथ शिंदे
-विधानसभेची आगळीवेगळी पंरपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेन- नाना पटोले
– नाना पटोले यांना पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा

– नाना पटोले एक चांगले नेतृत्व, शेतकऱ्यांसाठी लढा देणारे नेते-प्रफुल्ल पटेल

– विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज भरला, पटोले यांच्या उमेदवारीचा निर्णय शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून एकमताने- एकनाथ शिंदे 

-महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी बेकायदेशीर- चंद्रकांत पाटील 
-आम्हाला १७० आमदारांचा पाठिंबा- नवाब मलिक

-हिम्मत असेल तर आमदारांचे विभाजन करुन दाखवा, भाजपमध्ये गेलेले आता स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत- नवाब मलिक 

– शपथविधीपूर्वी नाव घेण्याची प्रथा भाजपची- नवाब मलिक, राष्ट्रवादीचे नेते
– विधानसभा अध्यक्षपदासाठी किशन कथोरे भाजपचे उमेदवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती 
– विश्वासदर्शक ठराव पारदर्शक पद्धतीने होईल- जयंत पाटील
-आजचा विश्वासदर्शक ठराव मंजूर होईल- जयंत पाटील
– विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला, नाना पटोले यांना उमेदवारी

– उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच; बाळासाहेब थोरात यांच्याकडून स्पष्ट

-खासदार चिखलीकर सहज भेटायला आले होते. ही भेट राजकीय नव्हती. वेगळा अर्थ काढू नका- अजित पवार

– वेगवेगळ्या पक्षात असलो तरी दुश्मन नाही- अजित पवार

-विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग, नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर अजित पवार यांच्या भेटीला

 

Back to top button