जळगाव : 'रॅपिड अँटिजेन'चे वापरलेले किट उघड्यावर  | पुढारी

जळगाव : 'रॅपिड अँटिजेन'चे वापरलेले किट उघड्यावर 

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा : मुक्ताईनगर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या खुल्या मैदानात कोरोना रॅपिड अँटिजेनचे किट उघड्यावर टाकून देण्यात आल्‍याचे धक्‍कादायक बाब समोर आले आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे

अधिक वाचा : फडणवीस-पवार भेटीबाबत राऊत म्‍हणाले…

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज रावेर मुक्ताईनगर मतदार संघाच्या दौर्‍यावर आहेत. वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज ते करणार आहेत. अशातच मुक्ताईनगरमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वापरलेले covid-19 अँटिजेन टेस्ट किट उघड्यावर टाकून देण्यात आल्‍याचे आढळून आल्‍याच्या धक्‍कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.    

Back to top button