यवतमाळ : दोन युवकांचा दगडाने ठेचून खून | पुढारी

यवतमाळ : दोन युवकांचा दगडाने ठेचून खून

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा ;  जिल्‍ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्‍ये दोन युवकांचा दगडाने ठेचून खून करण्‍यात आला. यवतमाळ व आणीं तालुक्यात मंगळवारी (दि.०२) या घटना घडल्‍या. या घटनांनी खळबळ निर्माण झाली आहे.

यवतमाळ शहरालगत गोधणी गावात झाडाखाली काही युवक खेळत होते. या खेळात व्यत्यय आणल्याच्या रागात दगडाने ठेचून मारण्यात आले. सुभाष काशीनाथ अंजीकर (३५) असे मृताचे नाव आहे. तो दारू पिऊन चिंचेच्या झाडाखाली बसून होता. तिथे सचिन श्रावण वाघमारे आपल्या मित्रांसोबत खेळत होता. या खेळामध्ये सुभाष वारंवार अडथळा आणत होता. यावेळी सचिन वाघमारे याने दगड त्याच्या डोक्यात घातला. सुभाष जागेवरच गतप्राण झाला. हे पाहून सर्वांनीच पळ काढला. पोलिस पाटलाने घटनेची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली.

अधिक वाचा : ‘…त्यामुळे फडणवीस खडसेंच्या घरी गेले असतील’

पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सुभाष निपचित पडला होता. त्याला तत्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गोंदणी गावात खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस आरोपी सचिन वाघमारे यांचा शोध घेत आहे.

अधिक वाचा : मुंबईत पेट्रोलचे दर न्यू यॉर्कपेक्षा दुप्पट!

आर्णी तालुक्यातील आंतरगाव येथे शेजारी राहणार्‍या युवकाचा पूर्ववैमन्‍स्‍यातून खून करण्यात आला.  ही घटना सोमवारी रात्री  घडली.  याप्रकरणी पाोलिसांनी पिता-पुत्रास अटक केली आहे. शेख समीर शेख छोटू ( 2३) असे मृताचे नाव आहे. पवन विजय राठोड आणि विजय परसराम राठोड अशी अटकेतील दोघांची नावे आहेत

Back to top button