पुणे : स्वारगेट अपहरण मुलीची विक्री करण्यासाठी | पुढारी

पुणे : स्वारगेट अपहरण मुलीची विक्री करण्यासाठी

पुणे,सासवड; पुढारी वृत्तसंस्था : स्वारगेट बस स्थानक परिसरात आईसोबत झोपलेल्या एका चार वर्षाच्या मुलीचे गुरूवारी मध्यरात्री अपहरण झाले होते. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर  तत्काळ तिचे फोटो आणि माहिती व्हॉट्स ऍपवरून व्हायरल केले. तब्बल गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची दहा पथके मुलीचा शोध घेत होती. दरम्यान एका तरुणाला फोटत दिसणारी मुलगी  सासवड पीएमपी बस स्थानकावर एका व्यक्तीसोबत दिसली. त्याने याबाबत पोलिसांना कळविले. त्यानतंर  आरोपीला पोलिसांनी पकडून त्या मुलीची सुटका केली.  पैशासाठी विक्री करण्याच्या हेतूने मुलीचे अपहरण केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

विलास कांबळे (रा. परभणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कांबळे हा काही पुण्यात कामासाठी आली होता. तो कात्रज परिसरात त्याच्या मित्रासोबत राहत होता. पण, त्याला काहीही काम मिळत नव्हते. त्यामुळे त्याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने मुलीचे अपहरण केले होते. तिला विकून पैसे मिळवणार असल्याचे त्यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत मुलगी आई-वडिलांसोबत स्वारगेट येथील एसटी स्थानाकाजवळी एका बस थांब्याजवळ झोपली होती. रात्री अकरा वाजेपर्यंत मुलगी आईच्या मांडीवर झोपली होती. पण, त्यानंतर मुलीला आईने शेजारी झोपविले. मध्यरात्री एक वाजता मुलगी शेजारी नसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी जवळ शोधा-शोध करून करून मुलगी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी मुलीचे अपहरण झाल्याचे सांगितले. स्वारगेट पोलिसांनी तत्काळ त्या मुलीचे फोटो, फोन क्रमांक व्हॉट्स ऍपवरून व्हायरल केले. तसेच, स्वारगेट व गुन्हे शाखेचे पोलिस मुलीचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत होते.

सासवड पीएमपी स्थानकावर अमोल शिंदे यांना  ही मुलगी व एक व्यक्ती दिलसी. त्यांनी व्हॉट्स ऍपवर मुलीचा फोटो पाहिला होता. फोटीतील मुलीग तीच असल्याची खात्री होताच त्यांनी तत्काळ याची  माहिती सासवड पोलिसांना दिली. त्यानुसार सासवड पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची माहिती स्वारगेट पोलिसांना दिली. स्वारगेट पोलिसांनी मुलीचा फोटो मागविला असता तीच मुलगी असल्याचे लक्षात आले. सासवड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन  स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  मुलीला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. आरोपी कांबळेकडे चौकशी केल्यानंतर त्याने पैशासासाठी मुलीचे अपहरण केले असल्याचे सांगितले. त्यासाठी आणखी दोघांनी मदत केली असल्याचे समोर आले आहे.

पैशासाठी मुलीचे अपहरण केल्याचे आरोपीने प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. एका व्यक्तीने त्यांना पाहिल्यानंतर सासवड पोलिसांना कळविल्यामुळे त्याला पकडण्यात आले आहे. आरोपीला स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


आण्णासाहेब घोलप

वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सासवड

Back to top button