औंढा नागनाथ: डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापार्‍यास तीन लाखाला लुटले | पुढारी

औंढा नागनाथ: डोळ्यात मिरची पूड टाकून व्यापार्‍यास तीन लाखाला लुटले

वसमत : पुढारी वृत्तसेवा ; डोळ्यात मिरची पूड टाकून  चोरट्यांनी  व्यापार्‍याकडील ३ लाख १० हजार रूपये लुटले. ही घटना औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे शुक्रवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत कुरूंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक वाचा : उस्मानाबाद : चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई

शिरडशहापूर येथील सुभाष उत्तरवार यांचे श्री व्यंकटेश्वरा ट्रेडींग कंपनी नावाने हळद खरेदी- विक्रीचे दुकान आहे.  हळद विक्री करण्यासाठी शुक्रवारी सुभाष उत्तरवार व कामगारांनी हळद ट्रकमध्ये भरली. हळदीने भरलेला ट्रक रात्री ११.३० च्या सुमारास त्यांनी विक्रीसाठी रवाना केला. त्यानंतर सुभाष उत्तरवार घरी निघाले. वाटेत अज्ञातांनी अचानक त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यांच्या जवळील ३ लाख १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. 

अधिक वाचा :‘सह्याद्री’त आदित्य ठाकरे बालंबाल बचावले

उरेवार यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. तोपर्यंत लुटारू पसार झाले होते. घटनेप्रकरणी सुभाष उरेवार यांनी कुरूंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक वाचा : बीडमध्ये मराठा मोर्चाला परवानगी नाकारूनही विनायक मेटेंचा निर्धार कायम! , वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी वसीम हाश्मी, हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी वाखोरे, कुरूंदा ठाण्याचे सपोनि सुनील गोपीनवार, जमादार बालाजी जोगदंड, पडवे, इम्रान सिद्दीकी, गजानन भोपे यांनी शिरड येथे भेट दिली. 

Back to top button