बारामती एमआयडीसीत वेश्या व्यवसाय, एकाला अटक | पुढारी

बारामती एमआयडीसीत वेश्या व्यवसाय, एकाला अटक

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती एमआयडीसी भागातील एका सदनिकेत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी अनिल रामचंद्र देवकाते (वय ४३, रा. निरावागज, ता. बारामती) याच्या विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

पोलिस कर्मचारी नंदू जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली. अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, पोलिस निरीक्षक महेश ढवाण, सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्यासह राहुल पांढरे, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, महिला पोलिस नाईक दळवी यांनी या कारवाईत भाग घेतला. मंगळवारी (दि. ८) ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक ढवाण यांना याबाबत माहिती मिळाली होती. 

देवकाते हा तांबेनगरजवळील एका अपूर्ण बांधकाम असलेल्या इमारतीत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशाचे अमिष दाखवत महिलेकडून वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ढवाण यांना मिळाली होती. त्यानुसार पंच तयार करण्यात आले. बनावट ग्राहकाकडे पैसे देत या ठिकाणी पाठविण्यात आले. या सदनिकेत देवकाते याने संबंधित महिला दाखवत बनावट ग्राहकाकडून एक हजार रुपये स्विकारले. 

बनावट ग्राहकाने लागलीच मिस्ड कॉल करत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी छापा टाकला असता अनिल देवकाते याला ताब्यात घेण्यात आली. मूळची अकोला जिल्ह्यातील व सध्या रांजणगाव एमआयडीसीत राहणारी २२ वर्षीय महिलेला देवकाते याने येथे वेश्या व्यवसायासाठी आणले होते. पैशाचे अमिष दाखवत देवकाते हे काम करून घेत असल्याचे या पिडीतने सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांनी सुमारे ६ हजार रुपयांचा माल जप्त केला. 

Back to top button