अकोला : ऑक्सीटोक्सीन इंजेक्शन विकणा-या टोळीला अटक, १० लाखाचा माल जप्त | पुढारी

अकोला : ऑक्सीटोक्सीन इंजेक्शन विकणा-या टोळीला अटक, १० लाखाचा माल जप्त

अकोला : पुढारी वृत्तसेवा

प्रतिबंधित ऑक्सीटोक्सीन इंजेक्शन बेकायदेशीररित्या विकताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रतिबंधीत व अपायकारक इंजेक्शन ऑक्सीटोसिन हे खदान परिसरात मोठ्या प्रमाणात जादा दराने विक्री केले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. यावरून पोलिसांनी छापा टाकून जयप्रकाश कलाचन्द मोटूवाणी (वय ५०, रा. कच्छी) खोली खदान याच्या घरी झापा टाकला. त्याठिकाणी १० बॉक्स ज्यात २१३५ नग बॉटल ऑक्सीटॉक्सीन भरल्या होत्या. त्याची किंमत १०,६७,५०० रुपये होते. हा सर्व साठा जप्त करून आरोपी जयप्रकाश मोटूवाणी, कमल शर्मा (रा. गया, बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Back to top button