वाघवाडीनजीक टेम्पोच्या धडकेत बालक जागीच ठार | पुढारी

वाघवाडीनजीक टेम्पोच्या धडकेत बालक जागीच ठार

इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा

वाळवा तालुक्यातील वाघवाडीनजीक पाणी आणण्यास  निघालेल्या बालकाला टेम्पोने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. नरसिंह गोविंद जाधव (वय 7, रा. खडी मशीन, वाघवाडी) असे मृत बालकाचे नाव आहे. 

याप्रकरणी टेम्पोचालक अर्जुन सदाशिव पाटील (वय 40, रा. कार्वे, ता. वाळवा) याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल झाला आहे.  पोलिसांकडून मिळालेली  माहिती अशी, आज सकाळी नरसिंह हा त्याचे भाऊ आणि 

आईसोबत पाणी आणण्यासाठी निघाले होते. आईने व त्याच्या भावाने रस्ता ओलांडला. नरसिंह हा मागे राहिला होता. तो रस्ता ओलांडत असताना समोरून आलेल्या टेम्पो ( एम.एच.10-सीआर-6947)  ने त्याला धडक दिली. त्या धडकेत नरसिंह याचा जागीच मृत्यू झाला. 

डोळ्यादेखत पोटच्या गोळ्याचा  जीव गेल्याने आईने घटनास्थळी हंबरडा फोडला होता. मुलाचे वडील गोविंद जाधव यांनी  इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

Back to top button