जळगाव : अपघातात बाप-लेक ठार | पुढारी

जळगाव : अपघातात बाप-लेक ठार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; भरधाव वेगाने धावणार्‍या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाप-लेक ठार झाले. दुर्घटना गुजरात पेट्रोल पंपाजवळ घडली. नागेश्‍वर पवार (वय ३५) आणि कार्तीक(वय ५) अशी मृतांची नावे आहेत.  याप्रकरणी  कंटेनरच्या  चालकाला आज अटक करण्यात आली .

अधिक वाचा : जळगाव : हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडले

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पिंप्राळ्यातील रहिवासी नागेश्‍वर पवार हे आपल्या मुलगा कार्तीकसह रात्री नऊच्या सुमारास घरी येत होते. यावेळी भरधाव वेगाने धावणार्‍या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला उडविले. यात या दोन्ही बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान, कंटेनर चालकाने अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले होते. या अर्जुन कुमार सिंग नावाच्या चालकाला आज अटक करण्यात आली आहे. बाप-लेकाच्या अपघाती मृत्यूमुळे पिंप्राळा परिसरावर शोककळा पसरली आहे

अधिक वाचा : जळगावात शिवसेनेचा खासदार निवडून येणार ! : संजय राऊत

 

Back to top button