भंडारा : सर्पदंशाने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू | पुढारी

भंडारा : सर्पदंशाने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

भंडारा : पुढारी वृत्तसेवा

मोहाडी तालुक्यातील केसलवाडा येथे सर्पदंशाने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना काल, रवीवारी (दि. १३) संध्याकाळी घडली. मृत मुलाचे नाव प्रणय गौरीशंकर देवगडे (वय १४, रा. केसलवाडा) असे आहे. तो जिल्हा परिषद हायस्कूल पालोरा येथे इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता.

काल गावात लग्न समारंभ होता. प्रणय याने लग्नात जेवण वाढण्याचे काम केले. दुपारच्या सुमारास लग्न कार्यक्रमात जेवण केल्यानंतर तो घरी गेला. त्याला खर्रा (गुटखा) खाण्याची सवय होती. आई वडिलांचा विरोध असल्याने मार पडण्याच्या भितीने तो घरातच खर्रा लपवून ठेवायचा व कुणीही नसल्याची संधी साधून खायचा. जेवन झाल्यानंतर त्याला खर्रा खाण्याची तलब आली. त्याने खर्रा लपवून ठेवलेल्या ठिकाणी हात टाकून खर्रा काढण्याचा प्रयत्न केला असता सापाने दंश केला.

हातातून रक्त येऊ लागले. पण आपल्याला उंदीर किंवा किड्याने चावा घेतला असावा असा प्रणवने केला. त्यानंतर तो घरातली जनावरे शेतशिवारात चराईसाठी घेऊन गेला. सायंकाळचे दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने तो घरी आला. घरच्यांनी विचारणा केली असता घाबरलेल्या स्थितीत खाटेवर झोपला असताना उंदराने चावा घेतल्याचा बनाव केला. परंतु प्रकृती आणखी खालाव गेली. त्यानंतर त्याला खासगी वाहनाने भंडारा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच खडकी गावाजवळ त्याने अखेरचा श्वास घेतला. भंडारा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

बिळात ठेवलेल्या खर्राने केला घात

प्रणयला खर्रा खाण्याचे व्यसन जडले होते. आई-वडीलांचा विरोध असल्याने तो लपून खर्रा खायचा. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे त्याने घरातील भिंतीच्या बिळात खर्रा लपवून ठेवला होता. नेहमी बिळात खर्रा लपवून खाण्याची सवय त्याच्या मित्रांना माहित होती. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने उंदरांना पकडण्यासाठी सापाने बिळाचा ताबा घेतला होता. अचानक प्रणयने बिळात खर्रा काढण्यासाठी हात घालताच सापाने चावा घेतला आणि घटना घडली.

नागपूर : सख्खे बहिण भाऊ नाल्यात वाहून गेले

चंद्रपूर : ताडोबाच्या बफर क्षेत्रात युवकाचा सर्पदंशाने मृत्‍यू 

पर्यटनबंदी असताना ताडोबात चित्रीकरणाला नियम डावलून शूटिंगला परवानगी

Back to top button