नाशिक : द्वारका परिसरात गॅस टँकर पलटी | पुढारी

नाशिक : द्वारका परिसरात गॅस टँकर पलटी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : द्वारका चौक परिसरात आज पहाटेच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाला. सुदैवाने गॅस गळती न झाल्याने पुढील धोका टळला. खबरदारी म्हणून पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस गळती झाली आहे का नाही याची शहानिशा करुन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन केले.

अधिक वाचा : सिडकोत चार चाकी जाळण्याचा प्रयत्न; नागरिकांमध्ये घबराट 

मुंबईहून सिन्नर येथील गॅस प्लांट येथे गॅस भरण्यासाठी भारत पेट्रोलियमचा टँकर जात हाेता. पहाटे पाचच्या सुमारास द्वारका चौक येथे वळणावर टँकर पलटी झाला. पहाटेची वेळ असल्याने परिसरात गर्दी नसल्याने अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

अधिक वाचा : सीआयडी असल्याचे भासवून ४५ हजारांचा चुना लावला

तसेच गॅस गळती होण्याचा धोका ओळखून पोलिस आणि अग्निशमन दलाने टँकरची पाहणी केली. मात्र गॅस गळती होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. अपघातानंतर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरकेडींग उभारून वाहतूक सुरळीत ठेवली. परिसरात बघ्यांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती.

Back to top button