पिंपरीत सख्ख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार | पुढारी

पिंपरीत सख्ख्या भावानेच केला बहिणीवर बलात्कार

पिंपरी : पुढारी ऑनलाईन

बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पिंपरी चिंचवडच्या बिजलीनगर परिसरात घडली आहे. रात्रीच्या वेळी आसपास कोणी नसल्याचे पाहून सख्या भावानेच बहिणीवर जबरदस्ती करत बलात्कार केला. या प्रकारानंतर बहिणीने वाच्यता करु नये म्हणून धमकी ही दिली. पीडित मुलगी पाच आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे संपूर्ण कुटुंब नांदेडचे रहिवासी असून पोट भरण्याकरता चिंचवड येथे भाड्याने घर घेऊन राहत होते. १५ मे रोजी रात्री बिजलीनगर येथील भाड्याने राहत असलेल्या घरात हॉलमध्ये झोपलेले होते. त्या रात्रीच्या वेळी आसपास कोणी नसल्याचे पाहून सख्या भावाने बहिणीवर जबरदस्ती करत बलात्कार केला. यानंतर पीडित मुलगी पाच आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. 

या प्रकाराची वाच्यता केल्याने आपली व कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पीडिताने घरी काही सांगितलं नाही. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने तिला त्रास सुरू झाला. त्रास सुरू झाल्यानंरत हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला. आईने पीडीत मुलगीकडे चौकशी केल्यावर हा घृणास्पद प्रकार तिने आईला सांगितला.

या प्रकाराची माहिती मिळाल्यावर तिचा नराधम भाऊ घरातून निघून गेला. आईने या सगळ्या प्रकाराची तक्रार चिंचवड पोलिसांकडे दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली व न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला तातडीने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Back to top button