दुचाकी व पिकअपच्या धडकेत एक जण जागीच ठार | पुढारी

दुचाकी व पिकअपच्या धडकेत एक जण जागीच ठार

ओतूर पुढारी वृत्तसेवा : कल्याण नगर महामार्गावरील पिंपरीपेंढार (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत असणाऱ्या हॉटेल रानबाबा समोर शनिवारी (दि. १९) सायंकाळी ७ सुमारास दुचाकी आणि पिकअप टेम्पोची भीषण धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाला असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली आहे.

वाचा : पुणे राष्ट्रवादी कार्यालय उद्घाटनावेळी गर्दी केल्याने १५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

या अपघातात दुचाकीस्वार (एमएच १४ बीयु ८४८७) राजेश संजू दहेकर (वय २२, रा. जाचकवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर, मुळ रा. बोरी, ता. चिखलदरा, जि. अमरावती) हे जागीच ठार झाले. तर जितेन देविदास राजनकर (सध्या रा. जाचकवाडी, मुळगाव वझ्झर, ता. अचलपूर, जि. अमरावती) गंभीर जखमी झाले आहेत. पिकअप टेम्पो (एमएच १४ एझेड ९६८) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताबाबतचा तपास सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बी. बी. तळपे हे करीत आहेत.

पिकअप चालकांना आवर घाला

कल्याण महामार्गावर धावणारे पिकअप टेंपो हे नेहमीच वेगवान असल्याचे निदर्शनास येते. रस्ते वाहतुक नियमांचा भंग करून अतिघाईने ओव्हरटेक करताना पिकअप टेम्पोने अपघात केल्याची असंख्य उदाहरणे आहेत. अशा अपघातात निष्पाप प्रवाशांचे बळी जाण्याचे प्रकार वाढीस लागल्यामुळे या पिकअप चालकांना पोलिसांनी आवर घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वाचा :दै ‘पुढारी’ इफेक्‍ट…सुटी असूनही काही तासात खड्डे बुजले

वाचा :  निवडणूक येऊ द्या…व्यवस्थित सांगतो : अजित पवार

Back to top button