अकोला : मित्रानेच केली मित्राची हत्या | पुढारी

अकोला : मित्रानेच केली मित्राची हत्या

अकोला; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक सिव्हील लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राचा गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली. मृतक आणि आरोपी दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. 

वाचा : महाराष्ट्रात आढळला डेल्टा प्लस व्हेरियंट!

शास्री नगर भागात एका खोलीत दोघेही नीट परीक्षेची तयारी करीत होते. 17 जून रोजी काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून एकाची मित्रानेच गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी सिव्हील लाईन ठाण्याचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. 

वाचा : आ. प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब आघाडीत बिघाडी निर्माण करण्याची शक्यता?

Back to top button