पणजी : चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या ‘त्‍या’ महिलेचे समुपदेशन करणार  | पुढारी

पणजी : चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या 'त्‍या' महिलेचे समुपदेशन करणार 

पणजी ; पुढारी वृत्‍तसेवा : मागील आठवड्यामध्ये सालेली येथील महिलेने मुलाच्या हव्यासापोटी गोमेकॉ परिसरातून एक महिन्याच्या तान्हुल्याचे अपहरण केले होते. त्यानंतर या महिलेला पोलिसांनी अटक केली होती. आठ दिवस तुरुंगात काढल्यानंतर न्यायालयाने तिचा सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकारानंतर महिला आयोगाने संबंधीत महिला आणि तिच्या कुटुंबाच्या समुपदेशनाचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा : प्रशांत किशोरांच्या I-PAC चे काम कसं चालतं? ज्यांनी पीएम मोदींना जिंकून आणि हरवूनही दाखवले!

संशयिता घरी परतल्यानंतर तिचे समुपदेशन करण्यासाठी गोवा महिला आयोगाच्या अध्यक्ष विद्या गावडे आणि मानसोपचार तज्ञ केतकी गडेकर यांनी तिच्या घरी भेट दिली. यावेळी तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला. येथून पुढचे काही महिने आयोगाचे सदस्य समुपदेशनासाठी महिलेच्या घरी जाणार आहेत. आमचे बाबा आमच्यावर खूप प्रेम करतात. आम्हाला ‘चिकन लॉलीपॉप’ खायला आवडते, त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी ते लॉलीपॉप घेऊन येत असल्याचे तिने सांगितले.

संशयितेचे सध्याचे वागणे, बोलणे सामान्य व्यक्तीप्रमाणे आहे. आपण काहीतरी गुन्हा केला असल्याचे भाव तिच्या तोंडावर किंवा बोलण्यात दिसून आले नाहीत. आमच्याशी मुक्तपणे संवाद साधने तिने पसंत केले. ‘मला त्या क्षणाला त्या मुलाला न्यावे वाटले, म्हणून मी नेले, असे उत्तर तिने दिले. तिने मुलाचे अपहरण केले असले तरी तिला तिच्या मुलींची खूप काळजी आहे. आल्यापासून तिने तिचा सर्व वेळ घर सावरण्यात घालविला असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले आहे. 

अधिक वाचा : भाग्यश्री मोटेनं पुन्हा पाणी-पाणी केलं! (photos)

संबंधित महिलेचा नवरा स्टील कंपनीमध्ये काम करतो. त्यांची घरातील स्थिती चांगली असल्याची माहिती गावडे यांनी दिली. या प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरु असल्याने कुटुंबाला समाजाने वाळीत टाकल्याची घटना घडेल, अशी भीती आम्हाला वाटत होती. तसेच नवरा – बायकोमध्ये वाद होतील, असे वाटत होते पण तसे काहीच झालेले नाही. रड चांगली गोष्ट आहे. महिलेला समुपदेनाची गरज आहे. तसेच मुलींच्यात नकारात्मकता निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांचेही समुपदेशन आयोगाकडून सुरु ठेवले जाणार असल्याची माहिती महिला आयोगाने दिली. 

Back to top button