नागपूर : कन्हान नदीत ४ युवक बुडाले | पुढारी

नागपूर : कन्हान नदीत ४ युवक बुडाले

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्यातील खापा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा वाकी शिवारातील कन्हान नदी पात्रात चार युवक बुडाले. चारपैकी एक मृतदेह सापडला असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, नागपूरहून सात ते आठ युवक सावनेर जिल्ह्यातील कन्हान नदीच्या पात्रा नजीक फिरायला गेले होते. या पैकी चार जण नदीच्या पात्रात उतरले. नदीकाठी थांबले असताना या चौघांना नदी पात्राचा अंदाज न आल्याने ते बुडाले. या पैकी एका युवकाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला आहे. तर उर्वरीत तीन जणांचा एसडीआरएफच्या मदतीने शोध सुरू आहे. 

बुडालेले युवक हे नागपूर शहरातील रहिवासी आहेत. तोफीक आशिफ खान (वय १६, रा. शांतीनगर), प्रविण गौरकर (२७)आवेश शेख नासीर शेख (१७, रा. व्हीएचबी कॉलनी), आरिफ अकबर पटेल (१६, रा. यादव नगर, जयभिम चौक) या युवकांचा समावेश आहे. घटनास्थळी  पोलिस अधीक्षक राकेश ओला नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सरंबळकर, पोलिस निरीक्षक अजय मानकर व पोलिस स्टेशन खापाचा स्टाफ घटनास्थळी पोहचला आहे. 

Back to top button