ड्रग्स प्रकरणात अंडरवर्ल्ड कनेक्शन; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक | पुढारी

ड्रग्स प्रकरणात अंडरवर्ल्ड कनेक्शन; दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला बुधवारी मुंबई अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अटक केली. इक्बाल कासकरला ड्रग्ज प्रकरणात प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आलं आहे. अलीकडेच एनसीबीने चरसांच्या दोन वस्तू पकडल्या होत्या, ज्या पंजाबमधील लोक काश्मीरहून दुचाकीवरून मुंबईला आणत असत. या प्रकरणात सुमारे २५ किलो चरस पकडण्यात आले.

अधिक वाचा : सीएम ठाकरेंनी २४ तासात निर्णय फिरवला! टाटा मेमोरिअलला बॉम्बे डाईंगमध्ये मिळणार १०० सदनिका

याच प्रकरणात पुढील तपासणी दरम्यान एनसीबीला अंडरवर्ल्डशी कनेक्शन मिळून आले. याच कारणास्तव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा ताबा एनसीबीने घेतला आहे. इक्बालला काही काळात एनसीबी कार्यालयात आणले जाणार आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, एनसीबीला ड्रग्स पुरवठा करण्यासाठी दहशतवाद फंडिंग आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती सापडली होती. 

अधिक वाचा : कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ च्या नव्या व्हेरीएंटबाबत सावध आणि सजग राहण्याचा सल्ला!

त्याआधारे एनसीबीने मुंबईतही अनेक ठिकाणी छापे टाकले. अटक केलेल्या आरोपींची चौकशी आणि चरस पुरवठा करण्याचे कनेक्शन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याकडे सापडल्याने एनसीबीने ठाणे कारागृहात बंद असलेल्या इक्बाल कासकरची रिमांड घेतली आहे.

अधिक वाचा : देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला कडक इशारा! (video)

Back to top button