शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलासह आत्महत्या | पुढारी

शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची मुलासह आत्महत्या

मुंबई: पुढारी ऑनलाईन 

शेजारी त्रास देतात, टोमणे मारतात आणि मुलांच्या खेळण्यावरून वारंवार भांडणे करतात या कारणांनी मुंबईतील एका महिलेने सात वर्षांच्या मुलासह १२ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. महिन्याभरापूर्वी या महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले होते. संबधित महिला या याआधी पत्रकार म्हणून काम करत होत्या.  अंधेरीतील चांदिवली येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून रेश्मा तेंत्रिल (वय ४४) असे महिलेचे नावे आहे. तर त्यांचा सात वर्षांचा मुलगा गरुण हाही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला आहे. 

वाचा : मोस्ट वॉन्टेड हाफिज सईद आहे तरी कोण, ज्याच्यावर अमेरिकेनं ७० कोटींचं बक्षीस लावलंय? 

रेश्मा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत शेजारी अयूब खान आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अयूब आणि त्यांचे कुटुंबीय रेश्मा यांना मानसीक त्रास देत होते, असे पत्रात लिहिले आहे.  रेश्मा यांच्या मुलाच्या खेळण्यावरून शेजाऱ्यांशी त्यांचे वाद होत होते. याबद्दल रेश्मा यांनी ३० मे रोजी फेसबुकवर एक पोस्टदेखील लिहिली होती. रेश्मा यांच्या पतीचे एक महिन्यापूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यात शेजारी नेहमी टोमणे मारत होते तसेच मानसिक त्रास देत होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रेश्मा यांचा भाऊ अमेरिकेत असल्याने तो अद्याप न आल्याने त्यांच्यासह मुलाच्या पार्थिवावर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत. रेश्मा यांच्या कुटुंबातील एकही सदस्य मुंबईत नाही. 

रेश्मा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे अयूबविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अयूब यांनी आधी रेश्मा यांच्या मुलाची सोसायटीकडे तक्रार केली होती. आपल्या कुटुंबातील सदस्याला गंभीर आजार आहे. रेश्मा यांचा मुलगा आरडाओरड करत असल्यानं त्यांना झोप येत नाही, अशी तक्रार  केली होती. 

रेश्मा यांचे पती शरद वाराणसीचे राहणारे होते. महिन्याभरापूर्वी शरद यांचे आईवडील कोरोना बाधित झाले होते. त्यांच्या देखभालीसाठी ते गेले असता त्यांनाही लागण झाली होती. उपचारादरम्यान आई, वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर शरद यांचाही मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्या एकट्याच राहत होत्या. 

वाचा : राहुल गांधी आज गुजरात कोर्टात

 

Back to top button