निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडेच मागितली ९१ लाखाची खंडणी | पुढारी

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याकडेच मागितली ९१ लाखाची खंडणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडेच खंडणी मागितल्याचा प्रकार कोंढवा परिसारात घडला. आरोपीने कोंढव्यातील ९१ गुंठे जागेवर अनधिकृत ताबा मिळवला.  त्यानंतर सेटलमेंटसाठी प्रत्येक गुंठ्याला एक लाख अशी ९० लाखाची खंडणी खुद्द निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडेच मागितली. या प्रकरणी पापा इनामादार टोळीतील मुसा कमरुद्दीन इनामदार (वय.४०, रा. इनामदार वाडा कोंढवा) याला खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे होणार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी आणि त्यांच्या मित्राची कोंढवा परिसरात ९१ गुंठे जागा आहे. संबधित जागेचा पापा नबी इनामदार, मुसा कमरुद्दीन इनामदार,  रूपचंद भिमाजी गजरे,  रफिक  इनामदार, अयाज अब्दुल रेहमान शेख  सर्व (रा. कोंढवा) यांनी अनधिकृत ताबा घेतला.

 

 त्यानंतर  जागेवरील ताबा सोडण्यासाठी प्रतीगुंठा एक लाख रूपये मिळून ९१ लाखांची खंडणी त्यांच्याकडे टोळीने  मागितली होती. दरम्यान फिर्यादींनी याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पथकाने आरोपी मुसा इनामदार याला अटक केली आहे. त्याचे साथीदार आणि मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी या परिसरात अशाचप्रकारे अनेकांच्या जागेंचा अनधिकृत ताबा घेत खंडणी उकळल्याचे काही प्रकार घडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  त्यामुळे पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. 

जेव्हा स्वत: शरद पवारच म्हणतात की, शरद पवारांनी असले उद्योग फार वर्षांपासून केलेत!

 

ही कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, कर्मचारी संपत अवचरे, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, राहूल उत्तरकर, विनोद साळुंके,संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, यांच्या पथकाने केली.

Back to top button