भंडारा: १२ वीत शिकणा-या मुलीची आत्महत्या | पुढारी

भंडारा: १२ वीत शिकणा-या मुलीची आत्महत्या

भंडारा : पुढारी ऑनलाईन 

तुमसर तालुक्यातील आष्टी येथे एका १९ वर्षीय तरुणीने घरामागील विहरीत उडी घेवून आत्महत्या केली. यशस्वी महेंद्र बोरकर (वय १९, रा.कवलेवाडा) असे या तरुणीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, कवलेवाडा येथील यशस्वी बोरकर ही विद्यार्थीनी आष्टी येथे आपल्या आत्याकडे १२ वर्षापासून राहत असून ती जनता महाविद्यालय तुमसर येथे १२ वीच्या वर्गाची शिकत होती. २५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सर्व सदस्य झोपेत असताना घरामागील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

गोबरवाही पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास ठाणेदार दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजन गोडंगे करीत आहेत.

नागपूर : महिला होमगार्डशी छेडखानी प्रकरणात पोलीस निरीक्षक निलंबीत

मानाच्या १० पालख्यांसाठी ‘लालपरी’ धावणार

अन्यथा राजकीय संन्यास! फडणवीसांचा एल्गार

Back to top button