चंद्रपूर : सोळा वर्षीय युवतीने आजोबाच्या घरीच घेतला गळफास | पुढारी

चंद्रपूर : सोळा वर्षीय युवतीने आजोबाच्या घरीच घेतला गळफास

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : घरचे कुटुंबीय शेतात कामाला गेल्यानंतर एका सोळा वर्षीय युवतीने आजोबाच्या घरी पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना आज रविवारी घडली. दिपाली बापूजी मरापे (वय १६) असे मृत युवतीचे नाव असून ती राजुरा तालुक्यातील टेंम्बूरवाही येथील रहिवासी होती. 

आज दुपारी एक-दोन वाजताच्या सुमारास दिपाली बापूजी मरापे हिने आजोबा उद्धव लचमा कुड़संगे यांचे घरी पोर्चमध्ये पाळण्याच्या दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली. मृतकाचे सर्व परिवार शेतकामाकरिता शेतात गेले होते. गावकऱ्याना प्रेत दिसताच त्यांनी त्याच्या परिवाराला कळविले असता त्यांनी घरी येऊन पोलीस पाटीलास सांगितले. त्यानंतर पोलीस पाटील यांनी ही माहिती विरुर पोलीस स्टेशनला दिली असता लगेच विरुर पुलिस स्टेशन ठाणेदार श्रीकृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात मौका पंचनाम्या करिता पो.हवा वागदरकर, मपोशी सौजण्या, पोशी मडावी, सैनिक धनपालसिंग वाधावन पोहचून पंचनामा करण्यात आलला.

Back to top button