वाशिम पोलिसांनी पकडला ५ लाखाचा गांजा  | पुढारी

वाशिम पोलिसांनी पकडला ५ लाखाचा गांजा 

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : वाशिम पोलिसांनी पुन्हा आपल्या धमाकेदार कारवाईने जनसामान्याची मने जिंकली आहेत. वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पोलीस अधिक्षक म्हणून जवाबदारी स्वीकारल्या पासून आजवर जिल्ह्यात अनेक मोठमोठ्या कारवाई करून गुन्हेगारी वृत्तीला आळा घातला आहे. त्याचीत पुनरावृत्ती म्हणून आज वाशिम पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे छापा टाकून अंदाजे सव्वापाच लाख रुपयाचा पंधरा किलो गांजा जप्त केला. तसेच आरोपीच्या मुसक्या ही आवळल्या आहेत.

अधिक वाचा : ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही : जयंत पाटील 

आपल्या सिंघमस्टाईल कारवाईसाठी प्रचलित असलेले गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे वाशिमचे पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या शिलेदारांनी मिळालेल्या माहीतीवरुन वाशिम येथे एका ठिकाणी छापा टाकत सव्वापाच लक्ष रूपये किंमतीचा पंधरा किलो गांजा पकडला. तसेच आरोपीलाही अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे. या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय जाधव साहेब, एएसआय भगवान गावडे, पोना अमोल इंगोले, सुनील पवार, राजेश राठोड, पोकॉ आस्वीन जाधव, प्रवीण राऊत, राजू गिरी, किशोर खंडारे, राम नागुलकर यांनी महत्वाची भुमिका बजावली.

Back to top button