एनसीबीच्या सलग दोन कारवाया | पुढारी | पुढारी

एनसीबीच्या सलग दोन कारवाया | पुढारी

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-गोवा क्षेत्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) सलग दोन दिवसांत किनारी भागात कारवाई करीत तिघाजणांना अटक केली आहे. त्यात मुद्देमालासह एका स्थानिकासह दोन नायजेरियनांना ताब्यात घेतल्याची माहिती विभागप्रमुख समीर वानखेडे यांनी दिली.

एनसीबीने जप्त केलेल्या मालाची बाजारात लाखो रुपयांची किंमत आहे. गोव्यातील किनारी भागातील अमली पदार्थांचा व्यवहार मोडीत काढण्यावर एनसीबीने लक्ष केंद्रित केले आहे. काही महिन्यांपासून एनसीबी कारवाई करीत असून, एक्स्टेसी/एमडीएमच्या 60 गोळ्या, 350 ग्रॅम नेपाळी चरस आणि एलएसडीच्या 20 ब्लोट्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  हणजूण येथील आईस्क्रीम पार्लरचा मालक रोकी जोस फर्नांडिस यांच्यासह चिडी ओसोता ओकोन्कवो उर्फ बेंजामीन आणि ओनायेका एगिक यांना ताब्यात घेतले आहे.

तीन अधिकारी जखमी

कारवाईसाठी एनसीबीचे अधिकारी जेव्हा पोहोचले, तेव्हा जंगलात पळालेल्या बेंजामिनचा पाठलाग करावा लागला. त्यावेळी तीन अधिकारी जखमी झाले. रोकी हा नुकताच अमलीपदार्थ विरोधी प्रकरणातून जामिनावर बाहेर आला होता. एगिकला 2019 मध्ये  अटक झाली होती; परंतु तो जामिनावर बाहेर आला होता.

 

Back to top button