पुणे : हडपसरमध्ये टोळक्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला | पुढारी

पुणे : हडपसरमध्ये टोळक्याचा दोघांवर प्राणघातक हल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मद्यप्राशन करण्यासाठी गेलेल्या दोघांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणातून सशस्त्र प्राणघातक हल्ला केला. हल्ला एवढा भयंकर होता की दोघांपैकी एकाच्या पोटातील आतडे बाहेर आले. त्याच्यावर ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून, प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी, संतोष महादेव गायकवाड (वय २८, रा. भोसले चाळ, लोणीकाळभोर, मुळ अहमदरनगर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पाच ते सहा जणांच्या विरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संतोष खेडकर असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास सायकर वस्ती हडपसर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष व त्याचा मित्र खेडकर हे दोघे रायकर वस्ती परिसरात मद्यप्राशन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांचे टोळके देखील तेथे आले होते. त्यातील एकाने फिर्यादी संतोषला मी प्रकाश गायकवाड उर्फ गोट्या याचा मित्र असून, तु त्याला ओळखतो का असे विचारले. त्यावेळी संतोष याने तो माझ्या परिचयाचा असून, भावासारखा असल्याचे सांगितले. आरोपींनी संतोष याला गोट्याला फोन करण्यास सांगितले. त्यावेळी संतोषला त्यांच्या हातात कोयते असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने फोन न करता दुचाकीवर बसून पळ काढला. 

यावेळी टोळक्याने कोयत्याने त्याच्या पाटीत वार केले. तर दुसरीकडे त्याचा मित्र खेडकर हा पाठीमागेच राहिला. टोळक्याने त्याच्या पोटात कोयत्याने सापास वार केले. गंभीर हल्यात त्याच्या पोटातील आतडे बाहेर आले होते. काही वेळ तो तसाच घटनास्थळी पडून होता. तेथील काही लोकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. वार गंभीर झाल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, पकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट दिली असून, स्थानिक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातो आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

पुणेः तोतया पोलिस उपनिरीक्षकाने नाेकरीच्‍या आमिषाने घातला ५१ लाखांना गंडा

पुणे : भाजीपाल्याच्या नावाने १४ टन गोमांसची वाहतूक

पुणे : बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड यांना कडक अटी-शर्तीवर जामीन

Back to top button