Gold Price : बजेट नंतर सोने तेजीत, चांदी घसरली, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold Price : बजेट नंतर सोने तेजीत, चांदी घसरली, जाणून घ्या नवे दर

पुढारी ऑनलाईन डेस्क

एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ सादर झाला असताना याच दरम्यान दुसरीकडे सोन्याच्या दरात काही प्रमाणात तेजी आली. तर चांदीच्या दरात घसरण झाली. सराफा बाजारात २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७,९७६ रुपयांवर पोहोचला. काल सोमवारी हा दर ४७,८३४ रुपयांवर बंद झाला. आज बाजारात त्यात तेजी दिसून आली. दरम्यान, आज चांदीचा प्रति किलो दर ६०,९९६ रुपयांवर आला आहे. काल सोमवारी चांदीचा दर ६१,०७४ रुपयांवर जाऊन बंद झाला होता.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोने ४७,९७६ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,७८४ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,९४६ रुपये, १८ कॅरेट सोने ३५,९८२ रुपये तर १४ कॅरेट सोन्याचा दर २८,०६६ रुपये आहे. (हे दुपारी २ पर्यंतचे अपडेटेड दर आहेत. त्यात बदल होऊ शकतो)

Gold Prices Today

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ सादर होण्यापूर्वी (Union Budget 2022) मंगळवारी सकाळी सोन्याचा दर (Gold Price Today) स्थिर पातळीवर खुला झाला. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोने प्रति १० ग्रॅम ४७,६५० रुपयांवर होते. याआधीच्या दिवशीच्या तुलनेत सोन्याचा दर किंचित वर असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर स्थिर आहेत.

२०२० मध्ये सोने दरात मोठी तेजी आली होती. दोन वर्षापूर्वी सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांपर्यंत उसळी घेत उच्चांक गाठला होता. पण २०२१ मधील ऑगस्टमध्ये सोने ४८ हजार रुपयांवर आले. त्यानंतर दरात चढ-उतार सुरुच आहे.

शुद्ध सोन्याची पारख कशी कराल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button