ब्लॉग- NO KISSING ZONE : बाजार होईल असं का वागायचं..! | पुढारी

ब्लॉग- NO KISSING ZONE : बाजार होईल असं का वागायचं..!

आर्या इल्हे : (NO KISSING ZONE ) खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो, इस दुनिया से नहीं डरेंगे हम दोनो.. असं म्हणत प्रेमाची ग्वाही देणारी प्रेमी युगुलं आज कल चप्पे चप्पे पे छा गये हैं नाही का ?

जिथे जात धर्म पाहिला जात नाही, प्रेमासाठी जीव की प्राण करतात आणि दोन आत्मे एक होतात त्यांना ना कोणाचा डर असतो ना पर्वा.. पण लॉकडाऊनच्या काळात नेमकी या प्रेमी युगुलांवर आली गदा!

मुंबईत कोव्हिड-19 चे निर्बंध लागू असल्याने मरीन ड्राइव्ह, वरळी सी-फेस, चौपाट्या बंद असल्याने प्रेमी युगुलांना बसण्याची जागा मिळत नाही मग काय जवळ येणं तर दूरच चुंबन काय घेणार!

म्हणून थोडा फार का होईना सहवास लाभावा म्हणून ही युगुलं मुंबईच्या रस्त्यांवर आडोशाला गुटरगू करताना दिसतायत ..
पण आता यांची गुटरगू इतकी वाढली की सोसायटी मधल्या लोकांना अख्खा पिच्चरचा प्रोमोच दिसू लागलाय ..
हो म्हणजे… लई दिवसांनं मिळाला मौका जवळ येना गडे, जवळ येना गडे मला एक चुम्मा देना गडे!

हे असंच पाहायला मिळतंय आणि बरोबर त्यांचे वाढते चाळे सुद्धा ते ही खुल्लम खुल्ला !

रस्त्यावर बसून प्रेमी युगुलांकडून केल्या जाणाऱ्या अश्लील चाळ्यांना कंटाळून मुंबईतील बोरिवली विभागातील सत्यम-शिवम सुंदरम या सोसायटीने चक्क ‘नो किसिंग झोन’ असं लिहून या लव्ह बर्ड्स ना दुसरा रस्ता दाखवला आहे.

ही कल्पना सुचली ती सोसायटीचे अध्यक्ष विनय अणसूणकर यांना. आम्ही त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली ते सांगतात चुंबन घेणं प्रेम करणं वाईट नाही पण यांचे अश्लील चाळे वाढले आहेत. आमच्या लहान मुलाना बाल्कनीमध्ये उभे राहून हे दृश्य पाहायला मिळते तर घटकाभर चहा प्यावा निसर्गाचा आनंद लुटावा म्हणून आम्ही बाल्कनीमध्ये येतो तर हे चित्र नजरेस पडते.

त्यामुळे कुठे तरी या लव्ह बर्डसने त्यांची जागा सुरक्षित ठिकाणी निवडावी आणि हे बंद व्हावे म्हणून विनय यांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी रस्त्यावर लिहिले NO KISSING ZONE. प्रेमी युगलांसाठी एक सूचना म्हणून असं लिहिण्यात आल्याचं ते सांगतात.

ज्याचा परिणाम नक्कीच झाला आहे. आता या रस्त्यावर प्रेमी युगूल येऊन परत निघून जातात .

आता प्रश्न हा आहे की, मग त्या गुटरगू करणाऱ्या प्रेमी युगुलांनी जावं तरी कुठे?

चुंबन घ्यावे तरी कुठं घटकाभर ….

प्रेमासारख्या पवित्र नात्यात जगायचा आनंद घ्यायचा तरी कधी आणि कसा?

चुंबन प्रेमाचा आधार असतो ज्याने एकमेकांमधला विश्वास आणि निखळ प्रेमाला बळ मिळते.

बघा ना चुंबनाविषयी जर इतिहासात डोकावले तर इतिहासकारांनी त्यावर भाष्य केलेले पाहायला मिळते. जसे की, भारतात वैदिक काळातील लिखाणात चुंबनाचा संदर्भ सापडतो. वात्सायनाच्या कामसूत्र या ग्रंथातही चुंबनाचा आधार मिळतो. फ्रान्समध्येही 6 व्या शतकात चुंबनावर चर्चा रंगण्याचा इतिहास मिळतो.

1997 ची टायटॅनिकमधील जॅक आणि रोझची जोडी कोणालाही न जुमानता खुलेआम प्रेम करणारी आपण पहिलीच असेल तसं पाश्चिमात्य देशात खुलेआम चुंबन घेणं काही वावगं नाही. पण आपल्या भारतात त्यांची परंपरा अजून रुजली नाहीये ऐवढंच !.. आपली संस्कृती हे मान्य करणारी ही नाही..

त्यामुळे आपण भारतात राहतो या जाणीवेबरोबरच सामाजिक भान ठेवणं ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे .

ते करतात म्हणून आम्ही पण करणार.. यात काय लाजयचे, आम्ही कुठे जायचे ..कोणाला काय वाटायचे ते वाटू दे आम्हाला फरक नाही पडत असे बिनघोर पणे ही युगल बोलतात..

अहो पण, प्रेमभावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा पण त्या पवित्र प्रेमाचा असा बाजार होईल असे असं का वागायचं!
यातून निगेटिव्ह संदेश तर जातच आहेत मात्र यातून काही विकृती ही निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

तुमचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ जर कोणी नजर चुकवून काढले, त्याचा गैरवापर झाला तर आयुष्यभर कर्माला दोष देत बसणार का!

खरंच थोडा विचार करायला हवा आपल्या प्रेमाचा बाजार होणार नाही, आपल्या प्रिय व्यक्तीचे प्रेमाचे पावित्र्य राखून ठेवणं आणि झाकून ठेवणं हे त्या लव्ह बर्ड्सच्याच हाती आहे. निदान आपल्या प्रेमाला गालबोट लागेल अशी कृत्य करू नये.

एखादी सुरक्षित जागा निवडा आणि फुलवा तुमच्या प्रेमाला होऊद्या …
हम तुम इक कमरे मे बंद हो और चाबी खो जाए …!

हे ही वाचलत का :

हे पाहा :

मुंबईजवळ वसलेल्या सोंडाई गडाची सफर

Back to top button