Fish fry : खवय्‍यांच्‍या पसंतीस उतरलेली 'येरमाळा मच्छी'  | पुढारी

Fish fry : खवय्‍यांच्‍या पसंतीस उतरलेली 'येरमाळा मच्छी' 

सोलापूर; जगन्नाथ हुक्केरी : मच्छी फ्राय (Fish fry) म्हटलं की, न खाणार्‍यांच्याही तोंडाला पाणी सुटते.अलीकडे येरमाळा मच्छीची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. स्थानिकांसह पर्यटकही चव चाखण्यासाठी येरमाळा मच्छीवर ताव मारण्यासाठी या परिसरात येत आहेत. मच्छी फ्राय (Fish fry) जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात खायला मिळते. परंतु प्रत्‍येक ठिकाणी तिची चव वेगळी असते. बंगाली मच्छी फ्रायचे वैशिष्ट्य वेगळे आहे. ते महाराष्ट्रातही खायला मिळते. मुंबई आणि दिल्लीतसुद्धा याची चव चाखता येते. पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभची चाहूल लागू लागली, की ‘मच्छी ताट’ असे बोर्ड दिसू लागतात. ते साधारण उजनीचं बॅकवॉटर संपेपर्यंत हे बोर्ड दिसतात. उजनीच्या बॅक वॉटरमध्ये मिळणार्‍या ‘चिलापी’ या मच्छीचं हे ताट असतं. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर येरमाळा मच्छी असे बोर्ड अधिक प्रमाणात दिसतात. बनविण्याच्या कलेमुळे हे मासे खायला खवय्ये पसंद करत आहेत. खास बनविण्याच्या पद्धतीमुळे येरमाळा मच्छीला अधिकच पसंती मिळत आहे.

 Fish fry गोड्या पाण्यातील माशांचेच मेन्यूत रुपांतर 

येरमाळ हे ठिकाण कळंब (जि. उस्मानाबाद) तालुक्यात आहे. गोड्या पाण्यातील माशांपासूनच मच्छी फ्राय Fish fry बनविण्यात येत असल्याने त्याची चव अधिकच चांगली आहे. खास येरमाळा मच्छी बनविणारे वस्ताद, कुक त्यांच्या कौशल्याचाही वापर करतात. यामुळे मच्छी फ्रायच्या प्रांतामध्ये येरमाळा मच्छीने नवीन ओळख निर्माण केली आहे. सध्या मांसाहार करणार्‍यांमध्ये येरमाळा मच्छीची चव चाखण्याची क्रेझ वाढत आहे.

Fish fry असं करा मच्छी फ्राय

तळण्यासाठी मासे कशात घोळवून तळणार हे आधी ठरवावे लागते. वेगवेगळ्या ठिकाणी तळण्यासाठी रवा किंवा तांदळाचे पीठ वापरले जाते. रव्याचा वापर करायचा असेल तर माशांना कोट करण्यासाठी बारीक रवा वापरावा. रवा आणि तांदळाचे पीठ वापरायचे असेल तर तांदळाचे पीठ जास्त घ्यावे लागेल आणि रवा थोडा कमी घ्यावे लागेल. मॅरिनेट केलेले मासे तांदळाचे पीठ किंवा रव्यामध्ये घोळवा. मासे घोळवताना त्यावर खूप पीठ लावणे टाळावे. अधिक पीठ लावल्यामुळे मासे कच्चे राहण्याची शक्यता असते. याशिवाय तेल लावल्यामुळे लवकर खराब होण्याची भीती अधिक असते. मासे तळण्यासाठी नेहमी नॉनस्टिक पॅनचा वापर करावा. कमीत कमी तेलाचा वापर करायचा असेल तर तेल तव्यावर चांगले पसरवून घ्यावे लागेल. तेल तापल्यानंतर गॅस मंद करुन त्यावर माशाची एकेक तुकडा सोडून एका बाजूने संपूर्ण शिजल्यानंतर मगच तो पलटा. तळताना तेल आवश्यक वाटत असेल तर तेल घालण्यास काहीच हरकत नाही. त्यानंतर मासा परतून दुसर्‍या बाजूनेही चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावा.

बनविण्याच्या पद्धतीमुळे आणि खाणार्‍यांना तृप्‍त करणारी खास येरमाळा मच्छी सध्या सर्वत्र प्रसिद्ध होत आहे. प्रत्येक महामार्गावरच्या हॉटेलमध्ये ‘येथे खास येरमाळा मच्छी उपलब्ध आहेत,’ असे फलक लावले आहेत. सोलापूर, तुळजापूर, पुणे, विजयपूर, हैदराबाद, सांगली महामार्गावरही येरमाळा मच्छी फ्रायची चव चाखता येते.

हॉटेल व्यावसायिक आक्रम बेग

आरोग्यासाठी फायदेशीर आहेत मासे खाणे

मासे हे ओमेगा -3 फॅटी सिडस्सारख्या आवश्यक पौष्टिक घटकांनी भरलेले असतात. मासे खाणं केवळ आपल्या हृदयावरच नव्हे तर आपल्या यकृत, मेंदू आणि अगदी झोपेसह आपल्या शरीराच्या इतर कार्यांवरदेखील परिणाम करतात. यामुळे मासे खाणे आरोग्यासाठी  फायदेशीर ठरते. पाहूया मासे खाण्‍याचे फायदे

  • हृदयरोगाचा धोका कमी होतो.
  • अल्झायमर रोग होण्याचा धोका कमी होतो.
  • नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत करते.
  • मासे व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्त्रोत आहे.
  • डोळे आणि केसांच्या आरोग्यासाठी अनेक फायदे.
  • मासे खाल्यानंतर झोप छान येते.
  • त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
  • संधिवात कमी करण्यासाठी मासे उपयुक्‍त.
  • मासे एक हलकं मांस आहे.
  • मासे कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात.

पाहा व्हिडिओ : महाराष्ट्र आणि दिल्लीच्या खाद्यसंस्कृती पासून बनवला तंदुरी वडापाव

 

Back to top button