पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकमध्ये स्कूल बस राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC-Karnataka State Road Transport Corporation) बसला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांना आपले हातपाय गमवावे लागले आहेत. बसमध्ये एकुण ४० विद्यार्थी होते. ही घटना घडली गुरुवारी (दि.५) घडली आहे.
माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यात ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी लोयोला स्कूल बस कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसला धडकली. यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. रायचूरचे जिल्हा आयुक्त नितेश के यांनी दिलेल्या माहितीनुसार, KSRTC ने मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्यांना ३ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.