हुबळीत एन्काऊंटर करणारी अधिकारी मूळ बेळगावची

बेळगावकरांकडून कौतुक : सर्वोच्च पदक देण्याची मंत्री हेब्बाळकरांकडून शिफारस
Hubballi encounter
पोलिस निरीक्षक अन्नपूर्णाpudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचाराच्या प्रयत्नानंतर रितेशकुमार (35) याने तिचा खून केला. या प्रकरणात त्याचा एन्काऊंटर करणार्‍या पोलिस निरीक्षक अन्नपूर्णा यांचे जन्मगाव बेळगाव जिल्ह्यातील गुजनट्टी (ता. मुडलगी) हे आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांना पोलिस पदक देण्यासाठी शिफारस केली आहे.

गुजनट्टीतील रंगप्पा आणि केंचव्वा मुक्कण्णावर दांपत्याची अन्नपूर्णा ही नववी मुलगी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. धर्मट्टी गावात त्यांनी माध्यमिक, तर बारावीपर्यंतचे शिक्षण गोकाक शहरात पूर्ण केले. त्यानंतर बी. एस्सी.चे शिक्षण त्यांनी धारवाड विद्यापीठातून पूर्ण केले. तेथून त्या बंगळूरला गेल्या. त्यांनी एम.एस्सी. इन अ‍ॅग्रीकल्चरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आयएएससाठी त्यांनी प्रयत्न केला. कृषी खात्यात त्या अधिकारी म्हणून सेवा बजावताना त्यांनी पोलिस उपनिरीक्षकपदासाठीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांची पोस्टिंग हुबळी शहर ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर सीईएनमध्ये नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या कारकीर्दीतील पहिला एन्काऊंटर रविवारी (दि. 14) केला.

पदकासाठी शिफारस

महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाबळकर यांनी पीएसआय अन्नपूर्णा यांना सर्वोच्च पदक देण्याविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाचवर्षीय बालिकेवर अत्याचारानंतर खून करणार्‍या रितेशकुमार (35) ला अन्नपूर्णा यांनी गोळ्या झाडून अटक केली. तिचा योग्य गौरव होणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

बाहेर राज्यातून कर्नाटकात आलेल्यांकडून गुन्हे वाढत आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा सुरु आहे. संशयिताचा एन्काऊंटर करुन पोलिसांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तरीही एन्काऊंटरबाबत चौकशी केली जाईल.

डॉ. जी. परमेश्वर, गृहमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news