

चिकोडी : तीन हजार रुपयांची लाच घेताना भूमापन खात्याचा अधिकारी लोकायुक्त पोलिसांना रंगेहात सापडला. सदर घटना हुक्केरी शहरात यमकनमर्डी येथे घडली. बसवराज कडलगी असे त्या अधिकार्याचे नाव आहे.
बाड (ता. हुक्केरी) येथील प्रकाश मैलाकी या शेतकर्याने आपल्या मालकीची काही जमीन मुलाच्या नावाने करण्यासाठी नकाशा मिळण्याबाबत अर्ज केला होता. सदर नकाशा तयार करण्यासाठी 8 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लोकायुक्त पोलिसांकडे शेतकर्यांनी केली.
त्यानंतर लोकायुक्त डीवायएसपी पुष्पलता यांच्या नेतृत्वातील पथकाने छापा टाकून लाच घेणार्या अधिकार्याला रंगेहाथ पकडले. भूमापक बसवराज कडलगी यांना अटक करण्यात आली आहे.