

बेळगाव : दुचाकीस्वाराला रिक्षा चालकाने धडक दिल्यानंतर वादावादी झाली. त्यानंतर अचानक रिक्षा चालकाने दुचाकीस्वाराला जबर मारहाण केली. भाग्यनगर दुसरा क्रॉस येथे शनिवारी ( दि. 18) घडलेल्या घटनेनंतर रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अवघ्या 12 तासांत रिक्षा चालकाला अटक करण्यात आली.
जोतिबा अनंत मण्णूरकर (रा. संभाजीनगर, वडगाव) असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. त्याने शनिवारी दुचाकीस्वार स्वप्निल बिंगारडे, रा. मारुती गल्ली, अनगोळ याला धडक दिली. त्यानंतर वादावादी झाली. जोतिबा याने स्वप्निल याला लोखंडी सळीने मारहाण केली. यामुळे स्वप्निल हा जखमी झाला. याप्रकरणी स्वप्निल याच्या भावाने टिळकवाडी पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली.