हिवाळी अधिवेशन बेळगावात होणारच : पालकमंत्री कारजोळ - पुढारी

हिवाळी अधिवेशन बेळगावात होणारच : पालकमंत्री कारजोळ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बेळगावात 13 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन होणारच याबाबत कोणताही संभ्रम नको, असा खुलासा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केला. या अधिवेशनासाठी शासनातर्फे नोटिफिकेशन ही जाोरी करण्यात आले आहे. त्याचबरोबर मंत्री, राज्यपाल आणि सदस्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या विधानपरिषदेची आचारसंहिता असल्यामुळे मला अधिकाऱ्यांची बैठक घेता आलेली नाही, मात्र मी रोज अधिकाऱ्यांशी संपर्कात असतो अशी माहिती पालकमंत्री आणि भाजप नेते गोविंद कारजोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुवर्ण सौंधमधील अधिवेशनासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासाठी सर्वांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचा संभ्रम नको. कुस्ती न लढताच भाजपा विधानपरिषदेचे कुस्ती जिंकेल असा दावा पालकमंत्री कारजोळ यांनी केला. कारजोळ यांनी पुढे बोलताना आमचे संख्याबळ हे जवळपास 70 टक्के आहे. त्‍यामुळे आम्ही या निवडणुकीत सहज जिंकू असा विश्वासही त्‍यांनी यावेळी व्यक्‍त केला.

या निवडणुकीत आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे हे आम्हाला माहित नाही, मात्र ही निवडणूक आम्ही सहज जिंकू पक्षात कोणतेही मतभेद नाहीत असेही ते म्हणाले.

Back to top button