बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: तीन दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला . जगदीश चूनमुरी (रा. तेग्गीन गल्ली, वडगाव) असे मृताचे नाव आहे.
जगदीशवर मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात जगदीश गंभीर जखमी झाला होता. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू होते. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्याला घरी घेऊन गेल्यानंतर त्रास सुरू झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. गेल्या सहा महिन्यांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातील हा दुसरा बळी ठरला आहे.
शहर परिसरात सुमारे १९ हजारहून अधिक मोकाट कुत्री आहेत. या कुत्र्यांवर नसबंदी मोहीम राबवण्यात येत असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. दिवसाला केवळ आठ ते दहा कुत्र्यांवरच शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्यामुळे इतर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा