बेळगाव : कार चोरणाऱ्या चौकडीला अटक; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, हुक्केरी पोलिसांची कारवाई | पुढारी

बेळगाव : कार चोरणाऱ्या चौकडीला अटक; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, हुक्केरी पोलिसांची कारवाई

हुक्केरी : पुढारी वृत्तसेवा :  जुन्या कार विकण्याच्या बहाण्याने त्या पळवून नेऊन त्या इतरांना विकणाऱ्या महाराष्ट्रातील चौकडीला अटक केली आहे. हुक्केरी पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्यांच्याकडून एक कार व दुचाकी जप्त केली. अटक केलेल्यांमध्ये एकजण औरंगाबाद येथील तर तिघेजण गडहिंग्लज तालुक्यातील आहेत.. अटक केलेल्या संशयितांमध्ये रवींद्र दामोदर राठोड (वय ३३, औरंगाबाद), मंजुनाथ मदकरी (३८), शिवप्रसाद केरी (२७) व सोमनाथ पाटील (२४, तिघेही रा. दुंडगी, ता. गडहिंग्लज) यांचा समावेश आहे.

हुक्केरी तालुक्यातील हुंज्यानट्टी येथील एकाची कार जुलै २०२२ मध्ये चोरीला गेली होती. याप्रकरणी हुक्केरी पोलिसांत नोंद झाली होती. या प्रकरणातील प्रमुख संशयित रवींद्र राठोड हा महाराष्ट्र एसटी महामंडळामध्ये लिपिक म्हणून कार्यरत होता. त्याची नोकरी गेल्यानंतर त्याने जुन्या कार विक्रीचा व्यवसाय सुरू केला. एखादी जुनी कार टेस्ट ड्रायव्हिंगसाठी घ्यायची आणि ती तिकडेच लंपास करायची असा उद्योग त्याने सुरू केला होता. एवढ्यावरच न थांबता तो विकलेल्या कारला जीपीएस लावून ती कुठे आहे याचा शोध घेत होता व पुन्हा तेथून उचलून आणत त्याची विक्री करत होता. रवींद्र हा पूर्वी गडहिंग्लज येथे काम करत होता. त्याने दुंडगीतील तिघांना हाताशी धरून अशा अनेक कारची कारची विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे.

हुक्केरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महम्मद रफिक तहशीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी गडहिंग्लज, कोल्हापूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, पंढरपुरात तपास कार्य हाती घेऊन संशयितांना अटक केली. पोलिस अधीक्षक संजीव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली अतिरिक्त एस. पी. गोकाकचे पोलिस उपअधीक्षक मनोजकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.एम. तहशीलदार, एएसआय ए. एस. सनदी पोलिस सी. डी. पाटील, सीएचसी आर. एस. डंग, गजानन कांबळे, मंजुनाथ कब्बूर, एस. आर. रामदुर्ग, अजित नाईक यांनी या टोळीचा छडा लावला.

हुक्केरीचे उपअधीक्षक मनोजकुमार नायक, पोलीस निरीक्षक एम. एच. ताशीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी या टोळीचा छडा लावला आहे.

Back to top button