बेळगाव : प्राणपणाने लढूया, विजय मिळवूया! सीमाप्रश्नी न्याय मिळेपर्यंत झुंजण्याचा निर्धार | पुढारी

बेळगाव : प्राणपणाने लढूया, विजय मिळवूया! सीमाप्रश्नी न्याय मिळेपर्यंत झुंजण्याचा निर्धार

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : मातृभाषेच्या राज्यात समाविष्ट होण्यासाठी पूर्वजांनी सांडलेले रक्त वाया जाऊ न देता संघर्ष करून सीमाप्रश्नी न्याय मिळवूच, असा निर्धार मंगळवारी हुतात्म्यांच्या साक्षीने खानापूर तालुक्यातील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी केला.

हुतात्मा दिनानिमित्त शहरातील स्टेशन रस्त्यावरील हुतात्मा नागाप्पा होसुरकर स्मारकासमोर अभिवादन करण्यात आले. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मराठी भाषिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याची हमी दिली. तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई म्हणाले, बेकीतून निर्माण झालेल्या मनातील शंका-कुशंका काढून टाका. अजूनही जे सीमा चळवळीपासून फारकत घेऊन बाजूला गेले आहेत, त्यांनीही सीमा लढ्याच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. देश रक्षणासाठी जीवाची बाजी लावलेल्या जवानांच्या बलिदानाइतकेच स्वभाषेच्या राज्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांचे बलिदान महत्त्वाचे आहे.

कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे म्हणाले, नुकताच घडून आलेल्या एकीमुळे तालुक्यातील मराठी भाषिकांच्या समितीकडून आशा उंचावल्या आहेत. समितीची लवकरच बैठक बोलावून संघटनेच्या पुढील कार्याची रूपरेषा आखण्यात येईल. सीमा चळवळीत जनतेचा सहभाग वाढवून तरुण आणि महिलांना सामावून घेतले जाईल.

माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार नाही, याची दक्षता घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी. माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर म्हणाले, पदाची अपेक्षा न बाळगता माय मराठी संवर्धनाचे कार्य केल्यास एकजूट कायम राहील. प्रारंभी हुतात्मा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सीमालढ्याचे अग्रणी डॉ. एन डी पाटील यांनाही आदरांजली अर्पण करण्यात आली.

सरचिटणीस सिताराम बेडरे, भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, महादेव घाडी, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, माजी ता. पं. सदस्य बाळासाहेब शेलार, माजी ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, मार्केटिंग सोसायटीचे माजी चेअरमन गोपाळ पाटील, मराठी सांस्कृतीक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक कारलगेकर, माजी सभापती मारुती परमेकर, रमेश देसाई, ब्रह्मानंद पाटील, पुंडलिक चव्हाण, शिवाजी पाटील, अरुण सरदेसाई, दिगंबर देसाई, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी पाटील, निरंजन सरदेसाई, संजय पाटील, राजेंद्र लक्केबेलकर, प्रसाद दळवी, प्रभाकर बिर्जे, मारुती गुरव, राजाराम देसाई, मर्‍याप्पा पाटील, प्रवीण सुळकर, शंकर पाटील, शंकर सुळकर, रामा खांबले, जयसिंग पाटील, डी. एम. भोसले, रमेश धबाले, वसंत नावलकर, मुकुंद पाटील, राजेंद्र कुलम, जगन्नाथ बिर्जे, दत्ता देसाई, अनिल पाटील, हणमंत गुरव, विठ्ठल गुरव, रणजीत पाटील, रविंद्र शिंदे, अविनाश पाटील, रुक्माणा जुंजवाडकर, पुंडलिक पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख दयानंद चोपडे, खानापूर बँकेचे चेअरमन अमृत शेलार, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, प्रवीण पाटील, दीपक देसाई, शामराव पाटील, लक्ष्मण पाटील, गणेश पाटील, भैरु कुंभार, सदानंद पाटील, दीपक देसाई, प्रदीप पाटील, कृष्णा कुंभार आदि उपस्थित होते.

Back to top button