बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 रोजी गुलबर्ग्यात | पुढारी

बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 रोजी गुलबर्ग्यात

बंगळूर : प्रदेश भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आतापासूनच मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांना कर्नाटकात आणण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी गुलबर्गा दौर्‍यावर येत आहेत. तांड्यातील लोकांना ते हक्कपत्र वितरित करणार आहेत. यानिमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मतदारसंघात भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

मोदींचा या महिन्यातील हा दुसरा कर्नाटक दौरा आहे. गुलबर्ग्यातील माळखेड येथे कार्यक्रम होणार आहे. तांड्यात राहणार्‍या 52 हजार कुटुंबांना हक्कपत्रांचे वितरण केले जाणार आहे. हैदराबाद-कर्नाटक भागातील रायचूर, बिदर, यादगिरी, विजापूर जिल्ह्यातील तांड्यातील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

Back to top button