बेळगाव : तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलावर विचित्र अपघात; दुचाकीस्‍वार गंभीर जखमी | पुढारी

बेळगाव : तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलावर विचित्र अपघात; दुचाकीस्‍वार गंभीर जखमी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या तिसऱ्या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलावर आज ( दि. १ ) विचित्र अपघात घडला. विरूद्द दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ओमनी कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली. या अपघातात एक दुचाकीस्वार उड्डाणपुलावरुन १५ फूट खाली रस्त्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाला.

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टिळकवाडी येथे तिसरे रेल्वे गेटजवळ नवीन उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. आज दुपारी एकच्या सुमारास भरधाव ओमनी कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्‍याने आणखी एका दुचाकीस्वाराला धडक दिली. कारने दुसऱ्या दुचाकीस्वाराला दिलेली धडक इतकी जोराची होती की, तो दुचाकीस्वार ब्रिजवरून १५ फूट खाली कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातात तिघेजण जखमी झाले. याप्रकरणी रहदारी दक्षिण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button