संजय राऊत हाजीर हो! बेळगाव न्यायालयाकडून समन्स | पुढारी

संजय राऊत हाजीर हो! बेळगाव न्यायालयाकडून समन्स

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  प्रक्षोभक भाषण करून भाषिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह तिघांना न्यायालयाने समन्स बजावले असून १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याची सूचना केली आहे.

खा. संजय राऊत ३० मार्च २०१८ रोजी बेळगावात झालेल्या एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्यासह किरण ठाकुर, प्रकाश बेळगोजी यांनी भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम १५३ आणि ५०५ (२) नुसार गुन्हा नोंदवून घेऊन समन्स बजाविण्यात आले आहेत. याचप्रमाणे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जेएमएफसी चौथ्या न्यायालयाने तिघांनाही नोटीस बजावली असून १ डिसेंबर रोजी न्या. मंजुनाथ बनकर यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे.

मला बेळगावात बोलावून अटककरण्याचा कट आहे. मात्र, मी अशा गोष्टींना घाबरत नाही. कोल्हापूरमार्गे बेळगावला जायचे मी पक्के केले आहे.
– खा. संजय राऊत

Back to top button