बेळगाव : कणकुंबीजवळ 909 लिटर मद्य जप्त | पुढारी

बेळगाव : कणकुंबीजवळ 909 लिटर मद्य जप्त

जांबोटी: पुढारी वृत्तसेवा :  कणकुंबीजवळ (ता. खानापूर) अबकारी विभागाने धाड टाकत 909 लिटर मद्य जप्त केले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

खानापूर अबकारी विभागाने सापळा रचून गोव्याहून बेळगावला येणार्‍या टाटा एक्स-1109 वाहनांवर कणकुंबीजवळ धाड टाकून वाहनासह 9 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दावलसाब शिदोगी, सदाशिव कोर्ती, उपनिरिक्षक जयराम हेगडे, पुष्पा गडदे मंजुनाथ मलपणनवर, ईराण्णा घाडी, प्रकाश दोणी, अरुणकुमार बधीगी यांनी कारवाईत भाग घेतला.

Back to top button