अथणी : विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू | पुढारी

अथणी : विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू

अथणी;  पुढारी वृत्तसेवा :  विजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर (ता. अथणी) येथे घडली. प्रदीप बापू माने (वय 18) विद्या बापू माने (वय 35) अशी मृतांची नावे आहेत.

प्रदीप माने हा विहिरीवर अंघोळीसाठी गेला होता. यावेळी मोटारीच्या तुटलेल्या तारेला त्याचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला. फार वेळ झाला तरी मुलगा का परत आला नसल्याने त्याची आई विद्या या विहिरीकडे गेल्या. यावेळी त्यांच्या पायाचा स्पर्शही तारेला झाला. त्यांना तत्काळ कवठेमंकाळ येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Back to top button