बेळगाव : अपघातात चचडीचे दोन तरुण ठार | पुढारी

बेळगाव : अपघातात चचडीचे दोन तरुण ठार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : अवजड वाहनाने धडक दिल्याने दोघा तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी हुक्केरी तालुक्यातील व्हळेम्मा नाल्याजवळ घडली. सदर दोघेही मृत तरुण सौंदत्ती तालुक्यातील चचडी येथील आहेत. मल्लनगौड यल्लानगौड पाटील (वय 22), सिद्धारुढ वीरभद्र करोशी (वय 24) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

सदर तरुण दुचाकीवरून जात असताना अवजड वाहनाने धडक दिली होती. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकट्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातदाखल करण्यात आले होते. मात्र, अपघातामध्ये अतिरक्तस्राव झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्याचा उपचाराचा उपयोग न झाल्याने मृत्यू झाला. घटनेची नोंद हुक्केरी पोलिस स्थानकात झाली आहे.

Back to top button